मन कक्षात तुम्हाला समुपदेशन मिळेल. तुमच्या कुठल्याही मानसिक समस्यांबद्दल तुम्ही तज्ञ समुपदेशकाशी मनमोकळेपणाने बोलू शकता.
मंगळवार आणि गुरुवार, २-५,
प्रत्येक पुलिस स्टेशन
दर शुक्रवार, ४-५, सिंहगड पोलिस स्टेशन अणि कोथरुड पोलिस स्टेशन
DCP झोन ३ आणि पुणे पोलीस मानसिक स्वास्थ्य प्रकल्प जलतरण उपक्रम
अधिक माहितीसाठी संपर्क: 9579389750
काय असेल ?
पोलीस 'मन' कक्षामधे वैयक्तिकरित्या (१:१) समुपदेशकांना भेटू शकता. मोकळेपणाने संवाद साधू शकता.
कुठे असेल?
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'मन' कक्ष असणार आहे. म्हणजेच स्टेशनच्या आवारात ही खोली असेल.
कधी असेल?
दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी २ ते ५ वाजता
कोणासाठी असेल?
झोन ३ च्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी.
माझे संभाषण वरिष्ठांपर्यंत जाईल का?
नाही. समुपदेशकाशी झालेले संभाषण गोपनीय असेल.
समुपदेशन घेण्यासाठी किती पैसे लागतील?
ही सेवा मोफत आहे.
समुपदेशनाचा मला काय फायदा होऊ शकतो?
समुपदेशनात काय साधायचे आहे हे निश्चित असते. समुपदेशनामध्ये मानसिक ताण व त्यावर उपाय ह्या साठी निश्चित उद्दिष्टे व रूपरेषा आखली जाते. समुपदेशनातून आपल्याला आपल्या स्वतः कडे, भूतकाळाकडे, आणि वास्तवाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा आणि परिस्थिती स्वीकारण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
काय असेल?
आपण या भावना-वर्तुळात भेटून, एक विषय घेऊन मानस मित्राच्या साहाय्याने आपल्या भावना, विचार, अनुभव एकत्रितपणे व्यक्त करू शकता. प्रत्येकाला व्यक्त करायला आणि शांतपणे बसून ऐकायला संधी मिळेल.
कुठे असेल?
सिंहगड रोड आणि कोथरूड पोलीस स्टेशन येथे. कधी असेल? दर शुक्रवारी, संध्याकाळी ४ ते ५ वाजता.
कोणासाठी असेल ?
झोन ३ च्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी. (एका गटात १० जणं सहभागी होऊ शकतात)
मला सक्तीने बोलावच लागेल का?
कोणावरही बोलायची सक्ती नाही. तुम्ही श्रोता म्हणून देखील ह्या गटाचा भाग होऊ शकता. तुमच्या उपस्थितीने तुमच्या साथीदाराला दिलासा मिळेल.
'मन' गटात भाग घेण्यासाठी किती पैसे लागतील?
ही सेवा मोफत आहे.
'मन' गटाचा मला काय फायदा होईल?
'मन' गटात भाग घेऊन आपली भावनिक जाणीव वाढेल. पोलीस कर्तव्याने येणारा एकटेपणा कमी होईल. आपल्या अनुभवातून दुसऱ्या व्यक्तीला आपण एकटे नसल्याचा दिलासा मिळेल. सामाजिक बांधिलकी रुजण्यास अधिक मदत होईल. कामाच्या ठिकाणी एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
चॉईस स्विमिंग पूल
वारी कॅफेजवळ, मॅकडोनाल्ड्सच्या पुढील लेन, कोथरूड
वेळ:
सकाळी - 6 to 10;
संध्याकाळी - 4 to 7
दर: 50/-
हार्मनी स्विमिंग पूल
चंद्रकांत मोकाटे जलतरण तलाव, अजंठा अव्हेन्यू सोसायटीजवळ
वेळ:
सकाळी - 8:15 to 9; 9 to 9:45; 9:45 to 10:30
संध्याकाळी - 6:30 to 7:15; 7:15 to 8
दर: 30/-
आर्टेमिस क्लब
नथुजी दगडू मेंगडे जलतरण तलाव, कमिन्स कॉलेज कर्वे नगर जवळ
वेळ:
सकाळी - 6 to 10; संध्याकाळी - 4 to 7
दर: 30/-
सुलोचनाबाई कुदळे जलतरण तलाव
नारायण बाग सी-बिल्डिंग, कुदळे बाग, वडगाव बुद्रुक
वेळ:
सकाळी - 6 to 10 संध्याकाळी - 4 to 7
दर: 30/-
नियम
अधिक माहितीसाठी संपर्क: 9579389750